ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कुडाळात खासदार संजय राऊत यांच्या विरोधात भाजपच्या पदाधिकाऱ्यांची तक्रार ; तत्काळ कारवाईची मागणी.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कुडाळात खासदार संजय राऊत यांच्या विरोधात भाजपच्या पदाधिकाऱ्यांची तक्रार ; तत्काळ कारवाईची मागणी.

प्रकाशन: 18 Jan 2023 10:36 PM
वाचन संख्या 74

विवेक परब | ब्यूरो चीफ : केंद्रीय कॅबिनेट मंत्री व भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते नारायण राणे वयांच्या बदल खासदार संजय राऊत यांनी लज्जास्पद शब्द वापरून अवमान केल्याबद्दल त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा तसेच या घटनेचा भारतीय जनता पार्टी कुडाळ तर्फे जाहीर निषेध करण्यात आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संजय राऊत यांच्यावर त्वरीत गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी व असे न झाल्यास भारतीय जनता पार्टीतर्फे कुडाळ तालुक्याच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिला.

त्यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा उपाध्यक्ष रणजीत देसाई, महिला जिल्हा अध्यक्ष संध्या तेरसे, संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत, जिल्हा कार्यकर्णी सदस्य आनंद शिरवलकर, तालुका अध्यक्ष विनायक राणे, दादा साईल, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर, जिल्हा बँक संचालक प्रकाश मौर्य, जेष्ठ नेते मोहन सावंत, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस रेखा काणेकर, युवा मोर्चा ता. अध्यक्ष रुपेश कानडे, पप्या तवटे, नगरसेवक गटनेते विलास कुडाळकर, ऍड राजीव कुडाळकर, गणेश भोगटे, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, कु चांदणी कांबळी, शहराध्यक्ष राकेश कांदे, सरचिटणीस देवेन सामंत, राजवीर पाटील, चंदन कांबळी सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स