ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवली तालुका युवासेनेच्या बैठकीत निवडून आलेल्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांचा आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार ; केले विशेष मार्गदर्शन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कणकवली तालुका युवासेनेच्या बैठकीत निवडून आलेल्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांचा आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार ; केले विशेष मार्गदर्शन.

प्रकाशन: 18 Jan 2023 09:22 PM
वाचन संख्या 96

आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुका युवासेनाची आढावा बैठक कणकवलीतल्या विजय भवनात संपन्न झाली. तालुक्यातील युवासेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. आमदार वैभव नाईक , माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, महिला जिल्हा संघटक नीलम पालव, युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न झाली.

पुढील निवडणुकी बाबत नियोजन करण्यात आली.प्रथमच तालुका प्रमुख झालेल्या उत्तम लोके यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. तालुका प्रमुख उत्तम लोके जिल्हापरिषद दौरा करणार व युवासेनाच्या रिक्त पदांची नियुक्ती करणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

आमदार वैभव नाईक व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते नवनिर्वाचित निवडून आलेल्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. कणकवली तालुक्यातील बोर्डवे शाखाप्रमुख पदी स्वप्नील शिंदे व कळसुली शाखाप्रमुख पदी नंदू परब यांची नियुक्ती करण्यात आली.

या बैठकीला उत्तम लोके, ॲड.हर्षद गावडे, राजू राठोड, तेजस राणे, गुरु पेडणेकर, अनुप वारंग, भाई साटम, नावलेकर, प्रतीक रासम, सचिन आचरेकर,आबू मेस्त्री, संतोष सावंत, रोहित राणे,बंटी वरुणकर,स्वप्नील शिंदे,अक्षय खांडेकर, नंदू परब,चेतन गुरव, संदीप गांवकर व युवासेनेचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स