मुख्याध्यापक श्री. प्रसाद कुंटे 'कार्यभूषण' पुरस्काराने सन्मानित.
नवजीवन वाघोसेवाडी मित्र मंडळ व ग्रामस्थांनी केला सन्मान.
कुडाळ । देवेंद्र गावडे ( उपसंपादक ) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या माध्यमातून दुर्गम खेड्यापाड्यांमधील विद्यार्थ्यांना विद्यादानाचे पवित्र कार्य अगदी प्रामाणिकपणे करणा-या व विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीमध्ये ज्यांच्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा आहे अशा मुख्याधापक श्री. प्रसाद कुंटे सर यांना ‘कार्यभूषण पुरस्कार’ नवजीवन वाघोसेवाडी मित्रमंडळ यांच्यावतीने प्रदान करण्यात आला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री.प्रकाश हळदणकर,माजी ग्राम.पं. सदस्या सौ.माया शृंगारे,श्री.रामचंद्र शृंगारे,वाघोसेवाडी शाळेच्या सहशिक्षिका सौ.पूर्वा गावडे,ग्राम.पं.सदस्य मंजुनाथ फडके,ग्राम.पं.श्री गोविंद कुडाळकर,श्री.प्रभाकर शृंगारे,इतर शाळेचे शिक्षक गोसावी मॅडम, आरोसकर मॅडम ,वरुटे सर, साळुंखे सर, मुख्याध्यापक श्रीकृष्ण ठाकूर सर, सेविका व मदतनीस,विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)