सावंतवाडीतील वेशभूषा स्पर्धेत कु.कबीर हेरेकरने वेधून घेतले लक्ष.
सहिष्णू पंडित | सहसंपादक : “मार्गे स्वच्छता विराजते…ग्रामे सुजनाः विराजते” , म्हणजे कुठल्याही गांवातील रस्त्यांवरील स्वच्छतेवरुन त्या गांवातील लोकांच्या सृजनत्वाचा किंवा त्यांच्या विचारांचा अंदाज येतो असा एक संस्कृत विचार आहे. थोडक्यात जिथे स्वच्छता नांदते तिथे सुबत्ता असतेच.
अगदी तसाच एक वेगळा विचार आपण म्हणू शकतो की एखाद्या लहान मुलाच्या स्वच्छतेविषयी तळमळीतून त्याच्या कुटुंबियांच्या स्वच्छतेबाबत सामाजीक वृत्तीचा अंदाज येतो.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीच्या शांतिनिकेतन प्रायमरी शाळेतील विद्यार्थी कु. कबीर हेरेकर या चिमुकल्याने वेशभूषा स्पर्धेत सफाई कर्मचारी तथा स्वच्छता दूताची भूमिका साकारत सगळ्यांचे लक्ष आकर्षित केले. यावरुन कबीरचे स्वच्छता संस्कार लक्षात आलेच पण सोबतच त्याच कबीर याचे शिक्षक वडिल नविद हेरेकर व शिक्षिका आई नबीला हेरेकर यांनी त्यांच्या मुलाला श्रमप्रतिष्ठेचा धडा दिला आहे हे कळते.
आत्ता कबीरचे वय पालक व शिक्षक यांचे विचार अंगात बाणवून घ्यायचे आहे. कालांतराने कु. कबीर हेरेकर अशाच समाज वैचारीक मार्गावर आणखीन नवीन यश संपादन करत राहील अशीच कबीरला ओळखणार्यांची धारणा आहे.
‘
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)