ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा संपन्न.

प्रकाशन: 17 Jan 2023 07:42 AM
वाचन संख्या 160

संतोष साळसकर | सहसंपादक : परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत वर्ष २०२१-२२ साठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत शिरगांव हायस्कूल, शिरगांवच्या इयत्ता ८ वी च्या तीन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून जिल्हा व तालुका गुणवत्ता धारक यादीत स्थान मिळविले. या तीन विद्यार्थ्याचा कौतुक सोहळा शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिरगाव येथे काल संपन्न झाला.

गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी :
१) कुमार निधिश राजनकुमार कदम : जिल्हा सर्वसाधारण यादीत २० वा क्रमांक

२) कुमारी माही सुधीर साटम : जिल्हा सर्वसाधारण यादीत ६३ वा क्रमांक

३) कुमारी चंदना सुनील पवार : तालुका यादीत ४ क्रमांक

या यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतर्फे पुस्तके ,गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला शिरगांव हायस्कूल, शिरगांवचे अधीक्षक रवींद्र जोगल, कुवळे हायस्कूल चे चेअरमन विजयकुमार कदम शाळा समिती सदस्य मंगेश लोके , शैलेंद्र जाधव, स्थानिक समितीचे अध्यक्ष संतोष फाटक, संस्था सदस्य सुधीर साटम, श्रीमती श्रेया साटम मॅडम, सुनील पवार, राजनकुमार कदम, शिष्यवृत्ती विभाग प्रमुख व्ही डी लब्दे आणि श्रीमती कांदळगावकर , श्रीमती एस एस कदम, श्री सुतार व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक श्री लब्दे यांनी केले तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन माजी प्राचार्य विजयकुमार कदम यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स