उद्या सडुरे येथे माता वेताई देवीचा वार्षिक जत्रोत्सव व श्री सत्यनारायण महापूजा.
वैभववाडी /नवलराज काळे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात दरवर्षी प्रमाण मौजे सडुरे येथील माता वेताई देवीचा वार्षिक जत्रोत्सव व सत्यनारायण महापूजेचे उद्या मंगळवारी १७ जानेवारीला आयोजन करण्यात आले आहे. पौष महिन्याच्या दर मंगळवारी देवीची पूजा होते माहेरवशिणी व गावातील महिला देवीच्या ओटी भरण्यासाठी येत असतात. शेवटच्या म्हणजेच चौथ्या मंगळवारी देवीचा मोठा जत्रोत्सव असतो यावेळी श्री सत्यनारायण महापूजेचे देखील आयोजन करण्यात येते. या उत्सवाला विविध कार्यक्रम देखील सादर करण्यात येतात.
स्थानिक भजन, दशावतारी नाटक अशा अनेक विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने देवीचा जत्रोत्सव साजरा केला जातो. या जत्रोत्सवास भाविकांनी उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)