ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
डाव्होस मध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्रासाठी तब्बल ४५,९०० करोडची गुंतवणूक ; उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

डाव्होस मध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्रासाठी तब्बल ४५,९०० करोडची गुंतवणूक ; उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती.

प्रकाशन: 17 Jan 2023 08:22 AM
वाचन संख्या 159

डाव्होसमधील ‘महाराष्ट्र पॅवेलीअन’ आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी सज्ज…!

मुंबई | ब्युरो न्यूज : स्वित्झर्लंड येथील डाव्होस शहरातील ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये अंदाजे ४५९०० कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे दिली.

श्री. सामंत म्हणाले, डाव्होस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आगमन झाले असून त्यांनी डाव्होस येथे सज्ज असलेल्या महाराष्ट्र पॅव्हेलियन’ला भेट दिली. महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये राज्याच्या विकासाचे प्रभावी दर्शन घडवले जाणार असून महत्वाच्या उद्योगांसमवेत येथे सामंजस्य करारही केले जाणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विविध कंपन्यां समवेत सामंजस्य करार करण्यात आले असून या माध्यमातून सुमारे १०,००० तरूणांच्या हाताला काम मिळणार असल्याची माहिती श्री. सामंत यांनी सांगितली. यावेळी, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, टी. कृष्णा, श्रे ॲरन, आशीष नवडे, स्टीफन व सर्व संबंधित उपस्थित होते.

यावेळी करण्यात आलेल्या सामंजस्य कराराबद्दल सविस्तर कंपनी सहित प्रकल्प अनुक्रमे ग्रीनको ऊर्जा प्रकल्प ,प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची १२००० कोटींची गुंतवणूक, बर्कशायर हॅथवे होम सर्विसेस ओरेंडा,इंडिया कंपनीची १६००० कोटींची गुंतवणूक, आय.सी.पी.इन्वेस्टमेंटस् / इंडस् कॅपिटल आस्थापनाची १६००० कोटींची गुंतवणूक,
रुक़ी फूडस् कंपनीची 250 कोटींची गुंतवणूक ,निप्रो फार्मा पॅकेजींग,इंडिया प्रायव्हेट लिमिटेड १६५० कोटींची गुंतवणूक असे आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स