ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
तळेरे येथे उद्या  'मधुर स्वर विमल' शास्त्रीय उपशास्त्रीय गायनाचा कार्यक्रम; संवाद परिवाराचे आयोजन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

तळेरे येथे उद्या 'मधुर स्वर विमल' शास्त्रीय उपशास्त्रीय गायनाचा कार्यक्रम; संवाद परिवाराचे आयोजन.

प्रकाशन: 14 Jan 2023 01:29 PM
वाचन संख्या 46

संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील “संवाद परिवार” आयोजित खास मकर संक्रांतीचे औचित्य साधून कणकवली येथील उगवते शास्त्रीय गायक श्री. मनोज भालचंद्र मेस्त्री यांच्या “मधुर स्वर विमल” या विशेष शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन संगीत मैफिलीचे आयोजन उद्या रविवारी, सायंकाळी ठीक ७ वा. तळेरे येथील मधुकट्टा (डॉ.ऋचा व डॉ.मिलिंद कुलकर्णी यांचे चैतन्य नर्सिंग होम) येथे आयोजित करण्यात आले आहे. मेस्त्री हे पं. डॉ.समीर दुबळे यांचे शिष्य असून त्यांचे महाराष्ट्रात विविध ठिकाणी गायनाचे कार्यक्रम झाले आहेत. 

संवाद परिवाराकडून दर महिन्याला साहित्य, कला विषयक एक उपक्रम आयोजित केला जातो. तळेरे परिसरातील रसिकांना साहित्य आणि कला विषयक अधिक अभिरुची निर्माण व्हावी, यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते. यापूर्वी मधुकट्ट्यावर डॉ. अरुणा ढ़ेरे, डॉ.अनिल अवचट, सुधीर सुखटणकर, डॉ. बाळ फोन्डके, प्रा. प्रदीप पाटिल, वैजनाथ महाजन, प्रसाद कुलकर्णी अशा नामवंत साहित्यिकांचे कार्यक्रम झाले आहेत. या संगीत मैफिलीत सौ. विश्रांती कोयंडे यांचे सहगायन असणार आहे. तर संदीप पेंडूरकर संवादीनी, रक्षानंद पांचाळ तबला वादन, तानपुरासाठी शुभम राणे, तालवाद्यसाठी सागर महाडीक, वेदांत कुयेसकर असणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्येने वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन संवाद परिवाराचे संस्थापक डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी केले आहे. 

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स