ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवण मधील आतू उर्फ अंतोन फर्नांडिस कालवश.

मालवण मधील आतू उर्फ अंतोन फर्नांडिस कालवश.

प्रकाशन: 15 Jan 2023 06:31 AM
वाचन संख्या 606

एक आदर्श युवा कार्यकर्ता हरपल्याने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून व्यक्त होतोय शोक.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या गवंडीवाडा येथील अंतोन उर्फ अंतोन जाॅन फर्नांडिस यांचे काल (१४ जानेवारी) दुपारी बेळगांव येथे उपचारा दरम्यान निधन झाले. ते ३८ वर्षांचे होते. गेले दोन आठवडे त्यांच्यावर एका अल्पशा आजारावर उपचार सुरु होते.

गेली १५ वर्षे सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणार्या आतू फर्नांडिस यांच्यावर युवासेना उपतालुकाप्रमुख पदाची सुद्धा जबाबदारी होती. विविध क्षेत्रात वावरताना त्यांनी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपली अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली होती. आतू यांच्या निधनाची वार्ता समजल्यानंतर मालवण शहरावर शोककळा पसरली असून संपूर्ण जिल्ह्यातील विविध सामाजिक क्षेत्रातून व माध्यमांमधून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई,पत्नी,भाऊ,बहिण,वहिनी व पुतणे असा परिवार आहे.

आज सकाळी १० वाजता गवंडीवाडा येथील त्यांच्या निवासस्थानाहून त्यांची अंत्ययात्रा असून १०:३० वाजता मालवणच्या रोझरी चर्चच्या आवारातील सिमिट्रीमध्ये (दफनभूमीत) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स