खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नांनी सिंधुदुर्ग जिल्हयात १६० नूतन बी.एस.एन.एल. (BSNL) मोबाईल टॉवर मंजूर.
कुडाळ । देवेंद्र गावडे (उपसंपादक ) : सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार श्री. विनायक राऊत यांनी गेल्या ७ वर्षाच्या कारकिर्दी मध्ये पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्हयात १०४ BSNL टॉवर मंजूर करुन घेतले होते. त्यापैकी बऱ्याच प्रमाणात कामे पुर्ण होवून मोबाईल टॉवर सेवेत कार्यरत आहेत.
सन २०२२ मध्ये नव्याने ८४ BSNL टॉवर मंजूर करुन घेतले होते. तर आता सिंधुदुर्ग जिल्हयातील ग्रामीण भागासाठी CAT १ मधून ५० तर CAT २ मधून १०१ व ९ अतिजूने व नव्याने असे मिळून १६० BSNL मोबाईल टॉवर मंजूर करुन घेतले असून त्यांची मंजूर यादी शासनाकडून जाहिर करण्यात आली आहे. मा. खा. श्री. विनायक राऊत यांनी जिल्हयात आजपर्यंत एकूण ३४८ BSNL मोबाईल टॉवर मंजूर करुन घेवून सिंधुदुर्ग जिल्हयाचा सर्व ग्रामीण भाग जोडण्याचे काम केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)