ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
चिपी विमानतळाला जोडणारे रस्ते दुरुस्तीसाठी निधी मंजूर..
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

चिपी विमानतळाला जोडणारे रस्ते दुरुस्तीसाठी निधी मंजूर..

प्रकाशन: 28 Sep 2021 02:47 PM
वाचन संख्या 87

७ कोटी ५० लाख रु निधी उपलब्ध

सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली मान्यता

पालकमंत्री उदय सामंत यांचे प्रयत्न व खा.विनायक राऊत, आ.वैभव नाईक, आ. दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश

ब्यूरो न्यूज | सिंधुदुर्ग : चिपी विमानतळ उदघाटनाच्या पार्श्वभूमीवर विमानतळ जोडणारे रस्ते दुरुस्तीस सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्यता दिली आहे. पालकमंत्री ना.उदय सामंत, खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नांतून दोन रस्त्यांसाठी ७ कोटी ५० लाख रु निधी मंजूर करण्यात आला आहे.
यामध्ये कुडाळ पिंगुळी म्हापण कोचरे श्रीरामवाडी कोचरेबंदर रस्ता (राज्यमार्ग १८३) ०/०० ते १३/३५० मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे निधी ४ कोटी ५७ लाख तसेच मठ कुडाळ पणदूर हुमरमळा जांभवडे घोटगेरस्ता (राज्यमार्ग १७९)किमी ०/०० ते ११/८५० मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे निधी २ कोटी ९२ लाख या रस्त्यांच्या कामांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मान्यता देण्यात आली. लवकरच या रस्त्यांच्या निविदा प्रकिया पार पाडून कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर याआधीही कुडाळ पिंगुळी पाट रस्त्याच्या दीड कोटीच्या कामाला वर्कऑर्डर देण्यात आली आहे. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स