ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
एकता मित्रमंडळ मालवण आणि रोटरी क्लब मालवणतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन.

एकता मित्रमंडळ मालवण आणि रोटरी क्लब मालवणतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन.

प्रकाशन: 28 Sep 2021 01:27 PM
वाचन संख्या 142

जागतीक स्वेच्छिक रक्तदान दिनानिमित्त मालवणात रक्तदान शिबीर

वैभव माणगांवकर | मालवण : कोविड महामारीनंतर देशातील रुग्णालयातील रुग्णांना रक्तपुरवठेची गरज ही अत्यावश्यक गरज आहे हे अनेक सिद्ध झाले.1 ऑक्टोबर रोजी ‘ जागतीक स्वेच्छिक रक्तदान दिन ‘ जगभर साजरा केला जात असून या दिवसाचे औचित्य साधून रोटरी क्लब मालवण आणि एकता मित्रमंडळ मालवण यांनी ” रक्तदान करुया व माणुसकी जपुया ” या विचाराद्वारे दिनांक 1 ऑक्टोबर http://localhost/news/public/uploads/2021 रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. मालवण बाजारपेठेतील कासारव्हाळी नजिकच्या देसाई बिल्डिंग येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिराची वेळ 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 09:00 ते दुपारी 01:00 वाजेपर्यंत असल्याची माहिती एकता मित्रमंडळाचे श्री .अमेय देसाई (9404535273) आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री उमेश सांगोडकर (9421237832) यांनी दिली आहे. या शिबिराच्या अधिक माहितीसाठी सदर वरील दोनही भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधता यायची सोयही करण्यात आली आहे.
शासकीय नियमांचे पालन करून आयोजित करण्यात आलेल्या या शिबीरात सर्वांनी स्वेच्छेने रक्तदान करायचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
ग्लोबल रक्तदाते मालवण यांनीही या उपक्रमाला विशेष सहकार्य केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स