बांदिवडे सरपंच अनंत ऊर्फ आशू मयेकर व ग्रामपंचायत सदस्य सहकार्यांनी दूर केली गांवातील बससेवेची गैरसोय ; ग्रामस्थांनी व्यक्त केले समाधान.
आचरा | प्रसाद टोपले: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या बांदीवडे येथील कणकवली आगारातील बस सेवा बरेच दिवस बंद होती . त्यामुळे शाळा काॅलेजच्या विद्यार्थी तसेच गांवातील इतर लोकांची बस येत नसल्याने गैरसोय होत होती.गांवची ही गैर सोय लक्षात घेवून विद्यमान युवा संरपंच अनंत (आशू)मयेकर व त्याचे ग्रामपंचायत सहकारी सदस्य तसेच उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्येकर्ते यांनी कणकवली बस सेवा आगार प्रमुखाची भेट घेवून बस सेवा चालू करण्याची मागणी केली. दुसर्या दिवशी बस सेवा चालू झाल्याने अनंत( आशु)मयेकर ग्रामपंचायत सदस्य ह्याचे गावच्या वतीने प्रशंसा होत आहे. तसेच आगार व्यवस्थापनाने घेतलेल्या तत्काळ दखलीबद्दलही समाधान व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)