रेकोबा हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश ; वेद प्रविण कुबलची चमक.
मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य परिषद पुणे मार्फत घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत श्री रेकोबा हायस्कूल वायरी चा विद्यार्थी कुमार वेद प्रवीण कुबल याला जिल्हास्तरीय ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. त्याचा जिल्ह्यात २४ वा क्रमांक आला असून त्याला २४८ गुण मिळाले आहेत. त्याच्या या यशामुळे शाळेच्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. रेकोबा हायस्कूलचा निकाल ५० टक्के लागला आहे. विघ्नेश सुनील मेस्त्री याला १८२ गुण , सिया गणेश परब १६४ गुण, रागिनी प्यारेलाल निषाद १२८ गुण मिळाले आहेत. त्यांना श्री कुबल सरांचे मार्गदर्शन लाभले. संस्था पदाधिकारी ,शालेय समिती पदाधिकारी ,स्थानिक समिती पदाधिकारी, पालक शिक्षक संघ, मुख्याध्यापिका सौ शिंदोळकर मॅडम ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद पालक विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)