मुलांनो शाळेचे, गावचे ऋण कधी विसरू नका ; संजय आंग्रे
साळशी हायस्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न
संतोष साळसकर | शिरगांव: मुलांनो आपण ज्या शाळेत शिकून मोठे झालो त्या शाळेचे, गावचे ऋण आपण कधीच विसरू नका. या शाळेच्या भौतिक सुविधासाठी माझ्याकडुन जी जी मदत, सहकार्य लागेल त्यासाठी मी नक्कीच करीन. असे आश्वासन माजी जि.प. सदस्य तथा उद्योगपती संजय आंग्रे यानी माध्यमिक विद्यामंदिर साळशी प्रशालेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या वेळी बोलताना सांगितले. माजी जि. प. सदस्य संजय आंग्रे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या दीप प्रज्वलन तसेच नूतन सरपंच सौ. वैशाली सुतार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली यावेळी मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत आलेल्या विशाल भिसे – प्रथम, हर्षाली पवार – द्वितीय, चिन्मय घाडी – तृतीय. या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवर हस्ते बक्षिसे देण्यात आली.यार्षीच्या दहावी मधील सराव परीक्षेत इंग्रजी विषयात प्रथम रोहित महाजन (८०पैकी ७०)गणित विषयात प्रथम (८०पैकी७२)मनोज भोगले. विज्ञान विषयात प्रथम(८०पैकी ७३) ऋग्वेद साटम. तीन आणि विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवर हस्ते.बक्षीस देऊन गौरविण्यात आले.प्रशालेचा आदर्श विद्यार्थी म्हणून सुमन लब्दे हिचा सत्कार करण्यात आला. तसेच काजल घाडीगावकर आणि मानशी लाड या मुलांचाही सत्कार करण्यात आला.शाळेचे मुख्याध्यापक माणिक वंजारे यांना आंंतर राज्य आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.या शाळेचे सहाय्यक शिक्षक पुरुषोत्तम साटम यांना गुुरूगौरव शिक्षक रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांंचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नूतन सरपंच सौ. वैशाली सुतार स्कूल कमिटी चेअरमन सत्यवान सावंत, संदीप कदम, चाफेड चे माजी सरपंच सत्यवान भोगले यांनी आपली मनोगत व्यक्त केली सरपंच वैशाली सुतार, उपसरपंच कैलास गावकर, चाफेड ग्रामपंचायत सरपंच किरण मेस्ञी, भरणी सरपंच अनिल बागवे , चेअरमन सत्यवान सावंत, उपचेअरमन प्रभाकर साळसकर, माजी उपसरपंच राजेंद्र साटम, माजी प.स. सदस्य सुनील गावकर, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग मिराशी, संदीप कदम, भूषण परुळेकर, साळशी केंद्रमुख्याध्यापक गंगाधर कदम, संदेश सावंत पटेल, चाफेड चे माजी सरपंच सत्यवान भोगले, माईन सरपंच सौ. नितिशा पाडावे, भरणी पोलीस पाटील आनंद ताम्हणकर, मुख्याध्यापक माणिक वंजारे, चाफेड चे माजी तंटामुक्त अध्यक्ष प्रवीण राणे, स्कूल कमिटी सदस्य संतोष साळसकर, चाफेड माजी सरपंच संतोष साळसकर आदी मान्यवरांसह इतर मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमा ची प्रस्तावना मुख्याध्यापक माणिक वंजारे यांनी केली. अहवाल वाचन संजय मराठे यांनी केले सुञसंचालन पुरुषोत्तम साटम यानी केले आभार स्वप्नील भरणकर यानी मानले सकाळ सञात क्रीडा स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना.
प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. राञी विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनपर कार्यक्रम संपन्न झाले.यावेळी ग्रामस्थ, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)