आचरा येथे उद्या स्वामी समर्थ पादुका दर्शन सोहळा...!
विवेक परब/ ब्यूरो चिफ : अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज पालखी व पादुका दर्शन सोहळा उद्या शनिवार दिनांक ७ जानेवारी रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत आचरा वरची वाडी येथील आदर्श नगर पटेल स्वा मिल नजीक सुनील खरात यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला आहे. यासाठी सकाळी १० वाजता आचरा तिठा येथून पादुका मिरवणूकीने कार्यक्रम स्थळी नेण्यात येणार आहेत. दुपारी महाप्रसाद, सायंकाळी महाआरती तरी भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आम्ही समर्थ महाराज उत्सव समिती आचराच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)