विनोद आईर यांचा मुंबई येथे सत्कार!
मसुरे | प्रतिनिधी : श्री गांगेश्वर विठ्ठला देवी सेवा संस्था मुंबई परबवाडी साळशी यांच्या वतीने हडपीड येथील स्वामी समर्थ मठ गाव समिती सचिव विनोद आईर यांचा ताडदेव मुंबई येथे सत्कार करण्यात आला. शाल, आणि सन्मानपत्र यावेळी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी अध्यक्ष राघो परब, खजिनदार अशोक परब, समीर परब, संतोष परब आदी सह श्री गंगे विठ्ठलादेवी सेवा समिती साळशी परबवाडी सदस्य उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)