ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
विज्ञान प्रदर्शनात मुणगे हायस्कुलचे दुहेरी यश!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

विज्ञान प्रदर्शनात मुणगे हायस्कुलचे दुहेरी यश!

प्रकाशन: 06 Jan 2023 09:24 PM
वाचन संख्या 134

विज्ञान शिक्षक प्रसाद बागवे यांच्या प्रतिकृतीची जिल्हास्तरावर निवड

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर:देवगड तालुकास्तरिय विज्ञान प्रदर्शनात मुणगे येथील श्री भगवती हायस्कूलने दुहेरी यश प्राप्त केले आहे. विद्यार्थी प्रतिकृती मधून नववी मधील विध्यार्थी विवेक मोहन परब याच्या बहुउद्देशीय बी पेरणी यंत्राला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच शिक्षक निर्मित प्रतिकृतीमधून विज्ञान शिक्षक प्रसाद बागवे यांच्या गणितीय ज्ञानरचनावाद या प्रतिकृतीला सुद्धा प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. दोन्ही प्रतिकृती जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी पात्र ठरल्या आहेत. तळेबाजार येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. दोघांचेही संस्था अध्यक्ष न. ना. पंतवालावलकर, उपाध्यक्ष सुरेश बांदेकर, विलास मुणगेकर, सचिव विजय बोरकर, कार्याध्यक्ष नारायण आडकर, मुख्याध्यापिका एम. बी. कुंज, व्यवस्थापक आबा पुजारे, शाळा समिती अध्यक्ष निलेश परुळेकर, सरपंच सौ. साक्षी गुरव, पोलीस पाटील सौ. साक्षी सावंत, सोसायटी अध्यक्ष गोविंद सावंत यांनी अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स