भाजपा दिव्यांग आघाडीच्या वतीने दिव्यांगबांधवांचा जिल्हास्तरीय मेळावा ऊत्साहात संपन्न
विवेक परब/ ब्यूरो चिफ-:भाजप दिव्यांग आघाडीच्या वतीने ४ जानेवारी २०२३ रोजी लुई ब्रेन दिनाचे व नुतन वर्षाचे औचित्त साधून दिव्यांग बांधवांचे विविध स्पर्धा व शालेय मुलांच्या स्पर्धा तसेच वनभोजनाचा व गेट टू गेदर व दिव्यांग बांधवाचा जिल्हास्तरीय मेळावा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन असाल – कुंदे माळरानावर करण्यात आले होते. या कार्यक्रमास सिंधुदूर्ग जिल्हयातील १०० पेक्षा जास्त दिव्यांग बांधव व त्यांचे पालक उपस्थित होते. लुई ब्रेन यांच्या प्रतिमेला जिल्हासंयोजक अनिल शिंगाडे यांच्या हस्ते पुष्प हार घालण्यात आला व सर्व दिव्यांग बांधव व पालक यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हासंयोजक अनिल शिंगाडे, सहसंयोजक शामसुंदर लोट, प्रकाश वाघ, प्रितम मठकर, सुधिर चव्हाण, सत्यवान पावले सुधाकर गवस, बाबूराव गावडे, दिक्षा तेली, स्वाती राऊळ आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी दिव्यांग बांधवांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या व त्यानंतर बक्षिस समारंभ करण्यात आला. सुनिल तांबे यांनी सर्वांचे आभार मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)