ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आजच्या पत्रकारांनी समाजातील खरे वास्तव निर्भीडपणे माडावे
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आजच्या पत्रकारांनी समाजातील खरे वास्तव निर्भीडपणे माडावे

प्रकाशन: 06 Jan 2023 07:47 PM
वाचन संख्या 60

अरूण उंडे:सिंधुदुर्ग प्रेस क्लब च्या वतीने पत्रकारदिन साजरा

सावंतवाडी /राकेश परब :ब्रिटिश राजवटीला न जुमानता समाज प्रबोधन करणाऱ्या बाळशास्त्री जांभेकरांमुळे खऱ्या अर्थाने पत्रकारतेची मुहूर्तमेढ रोवली, त्यांनी निर्भीड आणि निस्वार्थ भावनेने समाजातील वास्तव मांडले, आजच्या पत्रकारांनीही समाजातील खरे वास्तव मांडून निर्भीड पत्रकारितेतून लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट करावा असे आवाहन सावंतवाडी चे प्रभारी तहसीलदार अरुण उंडे यांनी केले.सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबच्या वतीने शुक्रवारी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन साजरा करण्यात आला त्यावेळी उंडे बोलत होते. यावेळी सावंतवाडी पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे, राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे परब,उपाध्यक्ष अनंत जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस हस्ते पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. प्रभारी तहसिलदार उंडे पुढे म्हणाले, पन्नास वर्षापुर्वी या देशात ब्रिटीशांची जुलमी राजवट सुरु होती, मात्र त्यांच्या या जुलमी राजवटीच्या विरोधात बाळशास्त्री जांभेकर यांनी आवाज उठवत आपल्या दपर्ण या दैनिकातून समाज प्रबोधनाचे काम केले. त्यांनी सामाजिक परिस्थिती जाणून समाज्यातील अन्यायाविरोधात वाचा फोडण्याचे काम केले, त्यांनी निर्भीड आणि निस्वार्थ भावनेने वास्तव मांडले. आजही लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकाराकडून आपल्या लेखणीतून समाज प्रबोधन होत आहे ते अधिकाधिक अजून धारधार व्हावे. मेगडे म्हणाले, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ खऱ्या अर्थाने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी जगासमोर आणला. त्यांनी ब्रिटिश राजवटीमध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही जागवली जांभेकर यांनी जो पायंडा घालून दिला तो आजही इथला पत्रकार जप्त आहे. घारे परब म्हणाल्या, इंग्रजांच्या काळात दर्पण या वृत्तपत्राच्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजांच्या जुलमी राजवटीला समाजासमोर आणले एक अभ्यासू व्यक्तिमत्व असलेल्या जांभेकर यांचे मराठी भाषेवरही चांगले प्रभुत्व होते आज त्यांचाच वारसा पुढे घेऊन समाजातील पत्रकार अन्याय अत्याचारावर वाचा पडत आहेत चांगला समाज घडवण्याचे काम पत्रकारांच्या हातून घडत आहे भविष्यात त्यांचे हे काम अधिक वृंदीगत होत जावो अशा शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाला जिल्हा प्रेस क्लबचेमाजी जिल्हाध्यक्ष हेमंत खानोलकर सचिव राकेश परब खजिनदार संदेश पाटील,दिव्या वायंगणकर,रुपेश हिराप, विश्वनाथ नाईक, मदन मुरकर आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 449

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स