ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बांदा सीमा तपासणी नाक्यातील नोकर्‍यांमध्ये स्थानिकांना संधी द्या
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बांदा सीमा तपासणी नाक्यातील नोकर्‍यांमध्ये स्थानिकांना संधी द्या

प्रकाशन: 05 Jan 2023 08:39 PM
वाचन संख्या 116

बांदा ग्रामपंचायत प्रशासनाने आ. नितेश राणे यांचे वेधले लक्ष

बांदा /राकेश परब: गोवा – महाराष्ट्र सीमेवर बांदा सटमटवाडी येथील आरटीओ विभागाचा सीमा तपासणी नाका लवकरच सुरु होणार आहे. सदर नाक्यामध्ये कार्यालयीन स्टाफसह नोकर्‍यांमध्ये स्थानिकांना संधी मिळावी अशी मागणी बांदा सरपंच प्रियांका नाईक व उपसरपंच जावेद खतीब यांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्याकडे केली. तसे लेखी निवेदनही देण्यात आले. आ. नितेश राणे यांनी तत्काळ संबंधित ठेकेदार कंपनीच्या अधिकार्‍यांशी मोबाईलवरुन संपर्क करुन तसे आदेशही कंपनीला दिले.

बांदा सरपंच, उपसरपंच यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी आज आ. नितेश राणे यांची कणकवलीत भेट घेतली. टोलनाक्यासाठी बांद्यातील भूमिपुत्रांनी दिलेल्या योगदानाची माहिती देण्यात आली. टोलनाक्यासाठी बांद्यातील भूमिपुत्रांनी कवडीमोलाने जमिनी दिल्या आहेत. नारळ, सुपारी, काजू, आंबा, कोकम बागायतीसह भातशेती क्षेत्रही संपादित केले आहे. बहुतांश शेतकर्‍यांना अद्यापपर्यंत मोबदलाही मिळालेला नाही. प्रशासनाने चुकीची माहिती देत, प्रसंगी धाक दाखवित भूमिपुत्रांचा रोष पत्करुन भूसंपादन केल्याचे जावेद खतीब यांनी स्पष्ट केले.   

  बांदा गावात व परिसरात उच्च शिक्षीत युवक युवती आहेत. त्यांना कार्यालयीन कामात सामावून घ्यावे अशी आग्रही मागणी करण्यात आली. संबंधित ठेकेदार कंपनीला तसे आदेश देण्याची विनंती करण्यात आली. आ. नितेश राणे यांनी तातडीने संबंधित कंपनीच्या जनरल मॅनेजरशी संपर्क साधला. सीमा तपासणीच्या कामात उच्च शिक्षीत स्थानिक उमेदवारांना संधी देण्याचे आदेश दिले. त्यात हयगय न करण्याचा इशाराही त्यांनी दिला.     

यावेळी सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, माजी जि. प. सदस्य श्वेता कोरगावकर, ग्रा. पं. सदस्य रुपाली शिरसाट, श्रेया केसरकर, रेश्मा सावंत, शामसुंदर मांजरेकर, रत्नाकर आगलावे, आबा धारगळकर, सिद्धेश महाजन, संदिप बांदेकर, शैलेश केसरकर आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स