ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
नील बांदेकरच्या मेहनती अष्टपैलुत्वाच्या नावे ठरले २०२२ साल ; वर्षभर केली बक्षिसांची लयलूट.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

नील बांदेकरच्या मेहनती अष्टपैलुत्वाच्या नावे ठरले २०२२ साल ; वर्षभर केली बक्षिसांची लयलूट.

प्रकाशन: 04 Jan 2023 03:00 PM
वाचन संख्या 94

(मालवण :सुयोग पंडित | बांदा :राकेश परब ): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केंद्र शाळा बांदा नंबर १ चा, चौथीत शिकणारा विद्यार्थी कु. नील नितीन बांदेकर याने वर्षाअखेरीस अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होऊन अनेक बक्षिसे पटकावली आहेत.
यात दोडामार्ग आयोजित राज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धेत तो प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला.
याच स्पर्धेदरम्यान त्याला सोनी मराठीच्या मालिकेसोबत एका महानाट्यासाठी तसेच मुंबई मेड वेबसिरीज साठी संधी चालून आली.
तसेच फ्लोरिडा अमेरिका आयोजित चित्रकला स्पर्धेतही तो अव्वल ठरला.
त्याचबरोबर ज्ञानी मी होणार या स्पर्धेत नील, केंद्र आणि बिट मध्ये साहील कोळापटे या जोडीदारासोबत प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला.
तसेच तालुका स्तरावरील ज्ञानी मी होणार मध्ये फक्त एका मार्क्सच्या फरकामुळे द्वितीय क्रमांकाचा शिलेदार ठरला.
त्याचबरोबर डॉट कॉम आयोजित वाचन स्पर्धेतही तो राज्यात प्रथम आला.
नीलच्या यशाचा आलेख उत्तरोत्तर वाढतच जात आहे.
नील ने आतापर्यंत कमाविलेल्या बक्षिसांची संख्या सुमारे १२१ एवढी झाली आहे.
चित्रकला, रंगभरण, गायन, कथाकथन, वक्तृत्व, मॉडेलिंग, निबंध, हस्ताक्षर यात त्याचा हातखंडा आहे.
कोणत्याही एकाच प्रकारच्या स्पर्धेत अडकून न पडता नील सर्वच स्पर्धेमध्ये आपले कौशल्य सिद्ध करत आहे.
तसेच तो तबला, गिटार, कोंगो अशी वाद्ये वाजविण्यातही तरबेज आहे.

त्याच्या या यशात त्याला बांदा केंद्र शाळेचे समस्त शिक्षकवर्ग,आई वडिल, तसेच शाळा व्यवस्थापन समिती यांचे असे मार्गदर्शन लाभले आहे. नीलची विविध स्तरांतून प्रशंसा होत आहे व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा मिळत आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स