शिष्यवृत्ती परीक्षेत वरद वाळके मालवण तालुक्यात प्रथम!
भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल मसुरेचा विध्यार्थी
मसुरे | प्रतिनिधी : भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल मसुरे प्रशालेचा विद्यार्थी कु. वरद सतीश वाळके याने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता ८ वी) ग्रामीण सर्वसाधारण विभागातून मालवण तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. त्याला ६५.७७% गुण मिळाले. संस्था अध्यक्ष प्रकाश परब, स्कुल कमिटी अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, डॉ. सुधीर मेहंदळे, अशोक मसुरेकर, बाबाजी भोगले, मुख्याध्यापक श्री. किशोर देऊलकर यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्कुल कमिटी, पालक व ग्रामस्थ यांनी वरदचे अभिनंदन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)