कट्टा येथे ५ जानेवारीला नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन.
विवेक परब | ब्यूरो चीफ : मालवण तालुक्यातील कट्टा येथे गुरुवार 5 जानेवारी रोजी लोकमान्य मल्टीपर्पज को-आँपरेटिव्ह सोसायटी लि. शाखा कट्टा, ह्युमन राईटस् असोशिएशन फाॅर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग तसेच लायन्स आय हाँस्पिटल-कणकवली यांच्या संयुक्त विद्यमानाने सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत विठ्ठल मंदिर नजीक बाजारपेठ कट्टा येथे मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. या मोफत नेत्र तपासणी शिबिरात लाभ घेणार्यांना अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मा बनवून मिळणार असून एक महिन्याचे औषध मोफत मिळतील. नोंदणी सपंर्कासाठी सौ. गौरी शैलेश सामंत (शाखाधिकारी) -9420339270, सौ. दीपिका गणेश सामंत (सीनियर असिस्टंट) 9404918008, प्रणाली दिलीप हिर्लेकर (अकाऊंटट असिस्टंट) 9423638171, गौरव वि. हिर्लेकर (ऑफिस अटेंडर) 9421174767
यांच्याशी सपर्क करावा अशी माहिती ह्युमन राईट्स असोशियशन फॉर प्रॉटेक्शनचे कोकण विभाग अध्यक्ष
संतोष नाईक यांनी दिली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)