साळशी हायस्कूल मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी.
संतोष साळसकर | सहसंपादक : देवगड तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर साळशी येथे गुरुवार ३ जानेवारी रोजी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी इ. ८ वी ची विद्यार्थिनी केतकी साळसकर ही होती.उपस्थिता़च्यां हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी सुंदर मनोगते व्यक्त केली.स.शिक्षक- साटम सरांनी सावित्रीबाई यांच्या कार्याविषयी छान माहिती दिली.
मुख्याध्यापक माणिक वंजारे सरांनी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश काय असला पाहिजे या विषयावर माहिती दिली.आजच्या काळात मुली, स्त्रीयांना समाजात जे मानाचे स्थान मिळवून दिले आहे याचे पूर्ण श्रेय सावित्रीबाई यांना जाते.तसेच त्यांच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.
शेवटी आभार प्रदर्शन नंतर कार्यक्रम स़ंपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता पवार या ९वी च्या विद्यार्थ्यीने अतिशय सुंदर रित्या केले.
***************************************
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)