ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
रोणापाल माऊली मंदिरात आजपासून धार्मिक कार्यक्रमांनिमित्त नाट्यमहोत्सव.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

रोणापाल माऊली मंदिरात आजपासून धार्मिक कार्यक्रमांनिमित्त नाट्यमहोत्सव.

प्रकाशन: 04 Jan 2023 02:12 PM
वाचन संख्या 38

बांदा | राकेश परब : श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळ, रोणापाल श्री देवी माऊली देवस्थान रोणापाल आयोजित मंदिरात दि.४ ते ८ जानेवारी दरम्यान पाच दिवस धार्मिक कार्यक्रमांसोबत दशावतारी नाट्य प्रयोग सादर करण्यात येणार आहेत. मंदिरात दररोज दुपारी १२ वा. व सायं. ७ वा. महाआरती होणार आहे. याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.
बुधवार दि ४ रोजी रात्रौ ८ वा. राजन परब व निलेश नाईक पुरस्कृत जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ, आरोस यांचा ‘अमृत कलश’ नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे.
गुरुवार दि. ५ रोजी रात्रौ ८ वा. कै. चंद्रकांत सिताराम गावडे यांच्या स्मरणार्थ गणेश(दादा) गावडे पुरस्कृत आरोलकर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ, आरवली यांचा ‘विधिलिखित’ नाट्यप्रयोग होणार आहे.
शुक्रवार दि. ६ रोजी रात्रौ ८ वा. अष्टविनायक दशावतार नाट्यमंडळ निरवडे यांचा ‘प्रतिशोध’ नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
शनिवार दि. ७ रोजी रात्रौ ८ वा. तळेवाडी युवक मंडळ रोणापाल पुरस्कृत बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्यमंडळ, कवठी यांचा ‘वेडा चंद्रहास’ नाट्यप्रयोग होणार आहे.
रविवार दि. ८ रोजी सकाळी १० वा. लघुरुद्र संग्रह दुर्गाहोम व शुध्दीकरण कार्यक्रम, महाआरती, दुपारी ३ वा. सवाद्य देवता भ्रमण, सायं. ७ वा. महाआरती, रात्रौ ८ वा. कुळघर गावडे रोणापाल पुरस्कृत मामा मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळ, मोचेमाड यांचा ‘नागभैरव’ नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
सदर कार्यक्रमासाठी राजाराम नाना नेमण यांनी दररोजचा लागणारे हार, वेणी व फुले तर सचिन परशुराम दाभोलकर पाच दिवसांसाठी लागणारी तुरडाळ तसेच महाप्रसाद श्री देवी माऊली पंचायतन रोणापाल, फौजदार गावडे, नवलू कोळापटे, रोणापाल ग्रामस्थ देऊळवाडी, हनुमंत गवस, कुळघर गावडे, संतोष कोळापटे, तसेच सदानंद गावडे, रामनाथ गावडे, तानाजी गावडे, विष्णू सावंत यांनी पुरस्कृत केला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

बांदा : प्रतिनिधी
श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळ, रोणापाल श्री देवी माऊली देवस्थान रोणापाल आयोजित मंदिरात दि.४ ते ८ जानेवारी दरम्यान पाच दिवस धार्मिक कार्यक्रमांसोबत दशावतारी नाट्य प्रयोग सादर करण्यात येणार आहेत. मंदिरात दररोज दुपारी १२ वा. व सायं. ७ वा. महाआरती होणार आहे. याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.
बुधवार दि ४ रोजी रात्रौ ८ वा. राजन परब व निलेश नाईक पुरस्कृत जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ, आरोस यांचा ‘अमृत कलश’ नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे.
गुरुवार दि. ५ रोजी रात्रौ ८ वा. कै. चंद्रकांत सिताराम गावडे यांच्या स्मरणार्थ गणेश(दादा) गावडे पुरस्कृत आरोलकर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ, आरवली यांचा ‘विधिलिखित’ नाट्यप्रयोग होणार आहे.
शुक्रवार दि. ६ रोजी रात्रौ ८ वा. अष्टविनायक दशावतार नाट्यमंडळ निरवडे यांचा ‘प्रतिशोध’ नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
शनिवार दि. ७ रोजी रात्रौ ८ वा. तळेवाडी युवक मंडळ रोणापाल पुरस्कृत बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्यमंडळ, कवठी यांचा ‘वेडा चंद्रहास’ नाट्यप्रयोग होणार आहे.
रविवार दि. ८ रोजी सकाळी १० वा. लघुरुद्र संग्रह दुर्गाहोम व शुध्दीकरण कार्यक्रम, महाआरती, दुपारी ३ वा. सवाद्य देवता भ्रमण, सायं. ७ वा. महाआरती, रात्रौ ८ वा. कुळघर गावडे रोणापाल पुरस्कृत मामा मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळ, मोचेमाड यांचा ‘नागभैरव’ नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
सदर कार्यक्रमासाठी राजाराम नाना नेमण यांनी दररोजचा लागणारे हार, वेणी व फुले तर सचिन परशुराम दाभोलकर पाच दिवसांसाठी लागणारी तुरडाळ तसेच महाप्रसाद श्री देवी माऊली पंचायतन रोणापाल, फौजदार गावडे, नवलू कोळापटे, रोणापाल ग्रामस्थ देऊळवाडी, हनुमंत गवस, कुळघर गावडे, संतोष कोळापटे, तसेच सदानंद गावडे, रामनाथ गावडे, तानाजी गावडे, विष्णू सावंत यांनी पुरस्कृत केला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 452

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स