ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
एकजुटीने व सहकार्याने पर्यटन व्यवसाय वाढवण्यायचा सावंतवाडी संस्थानचे युवराज भोसले यांचा आव्हान.....

एकजुटीने व सहकार्याने पर्यटन व्यवसाय वाढवण्यायचा सावंतवाडी संस्थानचे युवराज भोसले यांचा आव्हान.....

प्रकाशन: 27 Sep 2021 09:20 PM
वाचन संख्या 202

जिल्हा पर्यटन व्यावसायीक महासंघाच्या वतीने जागतीक पर्यटन दिन साजरा

वैभव माणगांवकर / मालवण : पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जी पर्यटन स्थळे आहेत, त्या पर्यटन स्थळांची माहिती देशी विदेशी पर्यटकांना देण्यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या कार्यात खांद्याला खांदा लावून आपण काम करू व जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय वाढीसाठी महासंघाला आवश्यक ते सहकार्य करू असे प्रतिपादन सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी येथे बोलताना केले.

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन दिन कार्यक्रमाचे आयोजन मालवण कोळंब येथील समर्थ हॉल मध्ये आयोजित करण्यात आला होता. त्याचे उद्घाटन सावंतवाडी  संस्थान चे युवराज लखमराजे सावंत भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली, मनसेचे नेते माजी आमदार परशुराम उपरकर, महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, जिल्हा बँकेचे संचालक व्हिक्टर डान्टस, मालवणचे सभापती अजिंक्य पाताडे, नकुल पार्सेकर, सतीश पाटणकर, जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, महासंघाचे तालुकाध्यक्ष अविनाश सामंत, महिला आघाडीच्या मेघा सावंत, कोळंब सरपंच प्रतिमा भोजने, पत्रकार प्रफुल्ल देसाई, मंगेश जावकर,किशोर दाभोलकर, शेखर गाड , पूनम चव्हाण आदी व इतर उपस्थित होते.

Article image

यावेळी राजन तेली म्हणाले, आज होणाऱ्या विकास प्रकल्पांचे श्रेय घेण्यासाठी राजकीय भांडणे होत आहेत. याचा विकासावर परिणाम होत आहे. जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठा वाव असून यासाठी सर्व राजकीय लोकांनी एकजूट ठेवून काम केले पाहिजे. मात्र जिल्ह्यातील राजकीय लोक एकत्र येत नाही हे जिल्ह्याचे दुर्दैव आहे. पर्यटन विकासासाठी राज्यकर्त्यांची व अधिकाऱ्यांची मानसिकताही बदलली पाहिजे, असेही राजन तेली म्हणाले.

यावेळी परशुराम उपरकर म्हणाले, पर्यटनाच्या बाबतीत सर्व दृष्टीने सिंधुदुर्ग सुजलाम सुफलाम जिल्हा आहे. जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांना एकत्र आणणे महत्वाचे आहे. पर्यटन पॉलिसी तयार करून पर्यटन व्यावसायिकांना अनुदान देऊन पर्यटन विकसासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. राजकारण विरहित पर्यटन निर्माण झाल्यास जिल्ह्याचा विकास साधला जाईल असेही उपरकर म्हणाले.

यावेळी बाबा मोंडकर म्हणाले, जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय हा स्थानिकांनी उभा केला आहे. मात्र मूलभूत सुविधांचा अभाव असून त्या सरकारने निर्माण करून दिल्या पाहिजेत. गेल्या दीड वर्षात सिंधुदुर्गातील पर्यटन व्यावसायिक कोरोना मुळे होरपळला आहे. पर्यटन विकसासाठी शासनाकडून निधी आला पाहिजे. क्लिष्ट कायदे, जमीन व वन विभागातील नियम यात जिल्हा अडकला असून यामुळे पर्यटन विकास होणार कसा असा सवालही बाबा मोंडकर यांनी उपस्थित केला.

यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा तसेच महासंघाने घेतलेल्या प्रशिक्षण शिबिरातील प्रशिक्षणार्थी चा महासंघातर्फे प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित पर्यटन व्यावसायिकांनीही आपले विचार मांडले. सूत्रसंचालन नकुल पार्सेकर यांनी केले. तर आभार गुरुनाथ राणे यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स