ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
आवळेगांवातील चर्मकार बांधवांमार्फत सरपंच आणि गट विकास अधिकार्यांना निवेदन…!

आवळेगांवातील चर्मकार बांधवांमार्फत सरपंच आणि गट विकास अधिकार्यांना निवेदन…!

प्रकाशन: 27 Sep 2021 07:10 PM
वाचन संख्या 287

ओंकार चव्हाण | आवळेगांव : आवळेगांव चव्हाणवाडी मधील चर्मकार समाजातील बांधवांनी श्री सुनील सावंत (सरपंच-ग्रामपंचायत आवळेगांव) तसेच गटविकास अधिकारी श्री विजय चव्हाण,वर्ग1 ,पंचायत समिती कुडाळ यांची भेट घेऊन त्यांना चव्हाणवाडी-चर्मकार (दलित) वस्तीसाठी आवश्यक असलेली मुलभूत सार्वजनिक कामे तातडीने करणे बाबतचे निवेदन देण्यात दिले आहे.

यामध्ये आवळेगांव -चव्हाण वाडीकडे जाणारा अपूर्ण असलेला रस्ता पूर्ण करणे व त्याचे खडीकरण-डांबरीकरण करणे,रस्त्याच्या नादुरुस्त असलेल्या भागातील मोरी दुरूस्ती करणे, समाज मंदिर काम करणे, नवीन स्मशान शेड उभारणे, आवळेगांव-कासारवाडीतील जलस्वराज्य योजनेच्या विहिरीवर पाणीपुरवठा योजना करून पाणीपुरवठा करणे
इ. कामे करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी गटविकास अधिकारी,कुडाळ यांनी निवेदनातील नमुद कामे करण्यासाठी आपल्या स्तरावरून पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.
निवेदन देण्यासाठी आवळेगांव -चव्हाणवाडी येथील श्री श्रीराम नारायण चव्हाण,गणपत चव्हाण,भिकाजी चव्हाण, यशवंत चव्हाण, श्रीकांत चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, अनंत चव्हाण,उमेश चव्हाण, सुधाकर चव्हाण, नागेश चव्हाण, विश्वेश्वर आवळेगांवकर,पंकज चव्हाण इ. उपस्थित होते.
या निवेदनाच्या प्रती १)मुख्य कार्यकारी अधिकारी, जि प सिंधुदुर्ग, २)सभापती-समाज कल्याण विभाग-जि प सिंधुदुर्ग, ३)श्री. नागेंद्र परब जि प सदस्य यांना देण्यात आल्या आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स