ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
सिंधुदुर्ग पुत्र संगीतकार 'कुणाल भगत यांना 'सर्वोत्कृष्ट शीर्षक गीता'चा पुरस्कार ..!

सिंधुदुर्ग पुत्र संगीतकार 'कुणाल भगत यांना 'सर्वोत्कृष्ट शीर्षक गीता'चा पुरस्कार ..!

प्रकाशन: 03 Jan 2023 02:05 PM
वाचन संख्या 57

संतोष साळसकर | सहसंपादक : अनेक लोकप्रिय मालिकांचे शीर्षक गीत आणि ट्रेंडींग गाण्यांना संगीत देणारी मराठमोळी जोडी  कुणाल भगत आणि करण सावंत यांनी संगीतबध्द केलेल्या ‘योगयोगेश्वर जयशंकर’ मालिकेसाठी ‘सर्वोत्कृष्ट शीर्षक गीत’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘बीग मराठी एंटरटेनमेंट’ पुरस्कार सोहळ्यात त्यांना गौरविण्यात आले. या जोडीमधिल कुणाल भगत हे सिंधूदुर्ग जिल्ह्यातील माणगांवचे सुपुत्र तर करण सावंत हे महाड येथील आहेत.

या जोड गोळीने आत्तापर्यंत महामिनिस्टर, किचन कल्लाकार, बस बाई बस, नवा गडी नवं राज्य, बॅंड बाजा बारात, अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई ? अश्या तब्बल १४ मालिकांच्या ‘शीर्षक गीतांना’ संगीतबद्ध केलेले आहे.

संगीतकार कुणाल – करण त्यांना मिळालेल्या पुरस्काराविषयी म्हनाले की, “आजपर्यंत आम्ही १४ मालिकेचं शीर्षक गीत केले आहे आणि त्यात योगयोगेश्वर जयशंकर या मालिकेला पुरस्कार मिळाला याचा खूप आनंद होत आहे. कारण हे शीर्षक गीत इतकं लोकप्रिय आहे की लोकांच्या प्रतिक्रिया नेहमी येत असतात की हे गाणं खूप मनाला भावणार आहे, रोज आम्ही ऐकतो, भक्तीत तल्लीन करणार आहे, लोकांच्या ह्या प्रेमामुळेच आज ह्या शीर्षक गीताला सगळ्यात जास्त वोट्स मिळून ‘बिग मराठी एंटरटेनमेंट’ पुरस्कार मिळाला. ही पोच पावती आमच्यासाठी संगीतकार, गीतकार म्हणून खूप मोलाची आहे.” 

पुढे ते सांगतात, “खर तर हा पुरस्कार आपल्या सगळ्यांचा आहे. तुम्ही हे गाणं आपलंसं करून घेणं आणि त्यावर इतकं प्रेम करण ह्या पेक्षा जास्त काय महत्वाचं असेल एका कलाकाराला. कर्लस मराठी, झंकार फिल्मस्, निर्माते संजय शंकर, सहनिर्माते चिन्मय उदगीरकर, गायक रविंद्र खोमणे आणि गायिका सोनाली सोनावणे यांचे आम्ही मनापासून आभार मानतो, तसेच सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार, कुणाल – करण वर असच प्रेम असुद्या, आणि आम्ही अशीच  नवनवीन गाणी  तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करू.”

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स