माळगांव येथे नेत्र तपासणी शिबिर संपन्न...!
शिबिरात ७२ नेत्र रुग्णांनी घेतला लाभ.
विवेक परब/ ब्यूरो चिफ : मालवण तालुक्यातील माळगाव येथे ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन व लायन्स आय हॉस्पिटल कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरा मध्ये ७२ नेत्र रुग्णांनी लाभ घेतला. सकाळी दहा ते दोन या वेळेत ॲड. गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश हायस्कूल माळगाव या ठिकाणी संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन डॉ. संजय खोत मांळगाव यांच्या हस्ते झाले.
शिबिराला उपस्थित ॲड. गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश हायस्कूलचे मुख्याध्यापक जोशी, माळगांव सरपंच सौ. चैताली साळगांवकर, ह्यूमन राईटचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, जिल्हाध्यक्ष मनोज तोरस्कर, तालुकाध्यक्ष सुधीर धुरी, सचिव राजेश कुमार लब्दे, तसेच डॉ. तांबे, डॉ. कदम, तसेच ह्युमन राइटचे मालवण तालुका खजिनदार रितेश सावंत, अर्जुन परब (काका) रोहित हडकर, ऋषिकेश कोरडे, हळवलकर, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)