बांदा ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपचे जावेद खतीब बिनविरोध.
बांदा /राकेश परब: बांदा ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी भाजपच्या जावेद खतीब यांची बिनविरोध निवड करण्यात आली. भाजपकडे संख्याबळ असल्याने व निर्धारित वेळेत केवळ जावेद खतिब यांचाच एकमेव अर्ज आल्याने निर्णय अधिकारी सुजित येरवळकर व ग्रामविस्तार अधिकारी लीला मोर्ये यांनी जावेद खतिब यांची निवड जाहीर केली. यावेळी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकच जल्लोष केला. यावेळी मावळते सरपंच अक्रम खान, नवनिर्वाचित सरपंच प्रियांका नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. श्वेता कोरगावकर, माजी सरपंच मंदार कल्याणकर, माजी सभापती शितल राऊळ, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत,शामसुंदर मांजरेकर, आबा धारगळकर,रत्नाकर आगलावे, प्रशांत बांदेकर, साईप्रसाद काणेकर, महीला सदस्या रिया येडवे,देवल येडवे,रुपाली शिरसाट, तनुजा वराडकर,श्रेया केसरकर, शिल्पा परब, रेश्मा सावंत, मावळत्या सदस्या उमांगी मयेकर, भाजप शहर अध्यक्ष बाबा काणेकर, माजी सरपंच दीपक सावंत, सिद्धेश महाजन, गुरु सावंत, शक्ती केंद्र प्रमुख मनोज कल्याणकर, राजा सावंत, दिलीप कोरगावकर, साई धारगळकर, शैलेश केसरकर, सुधीर साटेलकर, मंदार महाजन, गजानन मोर्ये, अक्षय मयेकर, सुधीर शिरसाट, सुनील राऊळ, महिला शहर अध्यक्षा अवंती पंडित, श्रुती कल्याणकर आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)