साळशी ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच सौ.वैशाली सुतार यांंनी स्विकारला पदभार.
तर उपसरपंचपदी कैलास गावकर बिनविरोध.
संतोष साळसकर | सहसंपादक: साळशी ग्रामपंचायत येथे सरपंच वैशाली सुतार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या उपसरपंच पदासाठी कैलास गावकर यांचा ऐकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.श्री सिध्देश्वर पावणाई ग्रामविकास पॅनल पुरस्कृत वैशाली विजय सुतार या ग्रामपंचायत निवडणूकीत सरपंचपदी प्रचंड मतानी निवडून आल्या.यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य विशाखा प्रभाकर साळसकर, कविता किशोर साळसकर, आदिती उमेश रावले,पांडुरंग शांताराम मिराशी,वैभव मनोहर साळसकर, पूनम दिनेश मणचेकर यानी सदस्य पदाचा पदभार स्वीकारला.
यावेळी नूतन सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना उपस्थितांनी पुष्प गुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.मावळते सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांंचे आभार मानले.यावेळी सरपंच वैशाली सुतार यांनी सर्वांच्या सहकार्यातून गावचा विकास साधला जाईल. असे मत व्यक्त केलेयावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रभाकर साळसकर, विजय सुतार गुरुजी, माजी सरपंच किशोर साळसकर, माजी उपसरपंच प्रकाश कुलकर्णी,विक्रांत नाईक, अनंत नाईक, गोविंद मेस्ञी, माजी ग्रामपंचायत सदस्य हर्षल साळसकर, जगन्नाथ मिराशी,सिताराम नाईक, उमेश रावले,योगेश परब,रमेश खरात,संतोष साळसकर,साईनाथ साळसकर,मंगेश नाईक, अक्षय गावकर,चंद्रकांत राणे, बबन घाडी,संतोष साळसकर,तलाठी स्वेतांजली खरात, मनिषा पाटील,पोलीस पाटील कामिनी नाईक,आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)