नेरूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी श्री. दत्ता म्हाडदळकर बिनविरोध..!!
लोकनियुक्त सरपंचपदी सौ. भक्ती घाडी..!!
नेरूर येथे पून्हा..शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा करिष्मा कायम..!!
नेरूर : देवेंद्र गावडे /उपसंपादक :सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूकिमध्ये नेरूर गावामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपला करिष्मा कायम राखतानाच आज झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणूकिमध्ये श्री. दत्ता म्हाडादळकर यांची ‘बिनविरोध’ निवड घडवून आणली.तत्पूर्वी झालेल्या सरपंचपदाच्या लढतीमध्ये देखील सौ. भक्ती घाडी या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लोकनियुक्त सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. त्यांना प्रविण नेरूरकर, मंजूनाथ फडके, गोविंद कुडाळकर, रोशनी नाईक, समिर नाईक, सुचित्रा नेरूरकर, ॠचा पावसकर, अरूणा चव्हाण, निकिता सडवेलकर व प्रभाकर गावडे या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांची साथ लाभणार आहे.याप्रसंगी नेरूर शिवसेना विभाग प्रमुख तथा मावळते सरपंच शेखर गावडे व मावळते उपसरपंच समद मुजावर यांच्यासोबत अजित हडकर, सिद्धेश नाईक, विजय लाड, माधवी गावडे, माया शृंगारे, दशरथ गावडे, विनय गावडे, सतिश म्हाडदळकर, बाबा म्हाडदळकर, देविदास नाईक, रामचंद्र शृंगारे, अमोल शृंगारे, सुनिल गावडे, मुरारी गावडे, नेरूर गावातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी आणि नेरूरमधील ग्रामस्थांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)