ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
कलमठ प्रभाग चार मधील ग्रामपंचायत सदस्या तनिष्का तेजस लोकरे यांच्याकडून सरपंच संदीप मेस्त्री व उपसरपंच स्वप्निल चिंदरकर यांचा सत्कार

कलमठ प्रभाग चार मधील ग्रामपंचायत सदस्या तनिष्का तेजस लोकरे यांच्याकडून सरपंच संदीप मेस्त्री व उपसरपंच स्वप्निल चिंदरकर यांचा सत्कार

प्रकाशन: 30 Dec 2022 11:41 PM
वाचन संख्या 45

मालवण | सुयोग पंडित: कलमठ सरपंच पदी निवडून आलेले संदीप मेस्त्री व उपसरपंचपदी पदभार स्वीकारलेले स्वप्निल चिंदरकर यांचा ग्रामपंचायत सदस्या तनिष्का लोकरे व तेजस लोकरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. भाजपचे सरपंच पदाचे उमेदवार संदीप मेस्त्री यांनी निर्विवाद वर्चस्व मिळवत शिवसेनेचे सरपंच पदाचे उमेदवारापेक्षा मोठे मताधिक्य मिळवल्याने सर्व सदस्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. मागील ग्रामपंचायत निवडणुकीत संदीप मेस्त्री हे सदस्य पदासाठी मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते, स्वप्नील चिंदरकर यापूर्वीही उपसरपंच होते त्यावेळी त्यांनी गावच्या विकासाकडे विशेष लक्ष देत आपली जबाबदारी पार पाडली त्यामुळे ही संधी पुन्हा त्यांना प्राप्त झाली तसेच गावच्या विकासासाठी सर्व सरपंच, उपसरपंच व सदस्य एकजूट होऊन कामे मार्गी लावू असे नवनिर्वाचित सदस्या तनिष्का लोकरे यांनी सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स