माजी पं.स. सदस्य गणेश तांबे यांची कणकवली शेतकरी ख. वि. संघ संचालकपदी बिनविरोध निवड.
संतोष साळसकर | शिरगांव :
कणकवली शेतकरी खरेदी विक्री संघ निवडणुकीसाठी ७ डिसेंबरला मतदान होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे काही दिवसांसाठी ही निवडणूक स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर १८ डिसेंबर रोजी पुन्हा स्थगिती आदेश उठल्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भाजप पुरस्कृत गणेश तांबे यांच्या विरोधात बाळासाहेब ठाकरे गटातील सुभाष जाधव फोंडाघाट यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने गणेश तांबे यांची अनुसूचित जातीच्या प्रवर्गातून बिनविरोध निवड झाली आहे.
त्यामुळे आता १४ जागांसाठी ७ जानेवारीला निवडणूक होणार आहे. या १४ जागांसाठी तब्बल २७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये उद्भव बाळासाहेब ठाकरे गट तसेच भाजप पुरस्कृत सिद्धिविनायक पॅनल यांच्यात आता थेट लर्खेत होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीनंतर कणकवलीत शेतकरी संघाच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे. यापूर्वी गणेश तांबे यांनी भरणी गावचे सरपंच म्हणून अनेक वर्षे चांगली कारकीर्द केली. जनमानसातील त्यांची प्रतिमा अतिशय चांगली असून आपल्या सरपंच पदाच्या कारकीर्दीत गावात अनेक विकासकामे केली. तसेच पंचायत समिती सदस्य म्हणून देखील आपल्या मतदारसंघात उल्लेखनीय कामगिरी केली. त्यामुळे एक अभासू, कार्यशील, कार्यतत्पर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची कणकवली तालुक्यात ओळख निर्माण झाली आहे.त्यांची कणकवली शेतकरी खरेदी विक्री संघाच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल विशेष अभिनंदन होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)