ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
पोलादपूर येथील राव समाजाचा वार्षिक महोत्‍सव उत्‍साहात साजरा.

पोलादपूर येथील राव समाजाचा वार्षिक महोत्‍सव उत्‍साहात साजरा.

प्रकाशन: 29 Dec 2022 11:15 AM
वाचन संख्या 86

संतोष साळसकर | शिरगांव :
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत विसावलेल्या ऐतिहासिक वारसा असलेल्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौऱ्याची गाथा असलेल्या पोलादपूर तालुक्यातील कोतवाल या गावी राव मराठा समाजाचा वार्षिक महोत्‍सव मोठया उत्‍साहात नुकताच साजरा करण्‍यात आला. वार्षिक महाेत्‍सवामध्‍ये भाग घेण्‍यासाठी मुंबईहून खास बसची मोफत सोयही सुभाष दरेकर यांच्‍या सौजन्‍यांनी करण्‍यात आली होती. सदर कार्यक्रम कालकाई मातेच्या मुर्ती मिरवणूक सकाळी नऊ वाजता गावकऱ्यांनी लेझीमच्या तालावर नाचत वाजत गाजत गावदेवी मंदिरात नेवून विधिवत पद्धतीने अभिषेक व होमहवन करून पूजा अर्चा करण्यात आले. यावेळी रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील पाहिलेच आमदार विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते व भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषद गटनेते व माजी नगरसेवक प्रवीण दरेकर , मुंबई हौसिंग फेडरेशन अध्यक्ष प्रकाशजी दरेकर यांच्या मुळे नावलौकिक झालेले गाव कोतवाल या गावामध्ये बहुजन समाज प्राचीन काळापासून एकोप्याने व गुण्यागोविंदाने नांदत असून पूर्ण गाव महोत्‍सवावेळी उपस्थित होता. मुबई पुणे येथील राहणाऱ्या महिलांनी गावातील सर्व महिलांसाठी हळदीकुंकूच्या कार्यक्रमाचे आयोजन केले , माजी सुभेदार परशुराम दरेकर व ग्रामस्थ यांचा सुश्राव्य हरिपाठ मोठ्या भक्तीमय वातावरणात येथील जागृत देवस्‍थानात पार पडले. सैनिक फेडरेशन महाराष्ट्रचे उपाध्यक्ष निवृत्त सुभेदार सुभाष दरेकर यांच्या वतीने, गावातील ज्येष्ठांच्या व सर्वांच्या साक्षीने “याची देही याचि डोळा” असा हा सोहळ्याचे औचित्य साधुन अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ल रखुमाईची प्रतिकृती देवून गौरविण्यात आले. त्यानंतर गावातील नवनिर्वाचित सरपंच रेखा अनंत दळवी (दरेकर) उपसरपंच राजेश कदम व सर्व सदस्यांना तसेच गावच्या ज्येष्ठांचा, प्रतिष्ठित व्यक्तींचा व पंचक्रोशीतील आलेल्या पाहुण्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. शेवटी अन्नप्रसादानंतर हा आनंदी सोहळा यशस्वीपणे पार पडला. सुत्रसंचलन ‌विजय दरेकर यांनी केले होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स