ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
जनसेवा निधी बांदा यांचे  पुरस्कार जाहीर.

जनसेवा निधी बांदा यांचे  पुरस्कार जाहीर.

प्रकाशन: 29 Dec 2022 11:21 AM
वाचन संख्या 246

बांदा | राकेश परब :
बांदा दशक्रोशीतील सेवाभावी  व्यक्तीमत्व स्वर्गीय डाॅ. द.भि. तथा बाबा खानोलकर यांच्या  जनसेवा निधी ,बांदा  या संस्थेमार्फ़त दिले जाणारे २०२२-२३ यावर्षीचे  पुरस्कार जाहिर करण्यात आले.यंदाचे पुरस्कार सोहळ्याचे ३४ वे वर्ष आहे.

यावर्षीचा आदर्श प्राथमिक शिक्षिक पुरस्कार  पुर्ण प्राथमिक शाळा वजराट नं.१(वेगुर्ला) प्रशाळेचे शिक्षक तेजस विश्वनाथ बांदिवडेकर, माध्यमिक आदर्श शिक्षिका पुरस्कार श्री देवी सातेरी हायस्कूल,वेतोरे च्या शिक्षिका  दिप्ती मोतीराम प्रभू  यांना,  तर एक क्रियाशील आदर्श समाजसेवक पुरस्कार कणकवली  येथिल सुषमा दयानंद  केणी,तर आदर्श हायस्कूल मुख्याध्यापक (माध्यमिक विभाग) पुरस्कार सिंधुदुर्ग सैनिक स्कुल व ज्युनिअर काॅलेज,आंबोलीचे प्राचार्य सुरेश तुकाराम गावडे  यांना जाहिर झाला  आहे.

पुरस्कारांचा वितरण सोहळा रविवारी  १ जानेवारी रोजी   जि.प.केंद्रशाळा बांदा नं.१ च्या   सभागृहात  दुपारी ३.३० जेष्ठ पत्रकार शेखर सामंत यांच्या  हस्ते संपन्न  होणार आहे. सोहऴ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन जनसेवा निधी ,बांदा या संस्थेच्यावतीने डॉ. मिलिंद अरविंद खानोलकर यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स