ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
'गणपती साना धबधबा' बनणार कणकवलीच्या पर्यटन विकासाची बारमाही खळाळती गंगा..!

'गणपती साना धबधबा' बनणार कणकवलीच्या पर्यटन विकासाची बारमाही खळाळती गंगा..!

प्रकाशन: 27 Dec 2022 07:05 PM
वाचन संख्या 53

नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या पाठपुराव्याला यश.

कणकवली | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीच्या ‘गणपती साना’ येथील बारमाही धबधब्याच्या कामाला अखेर पालकमंत्री रवींद्र चव्हाण व आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून व नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या पाठपुराव्याने २ कोटी ६० लाख ३३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

कणकवलीचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या संकल्पनेतून कणकवली गणपती साना या ठिकाणी कणकवलीच्या पर्यटन विकासात मोठी भर टाकणारा हा प्रकल्प करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र मध्यंतरीच्या काळात काही कारणाने या कामाला निधी मंजूर झाला नाही. व त्यानंतर हे विकास काम प्रलंबित राहिले.

कणकवली शहर विस्तारत असतानाच कणकवली शहरातील पर्यटन वाढीसाठी एक महत्त्वपूर्ण ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने कणकवली गणपती साना येथे जलस्त्रोतांचे सौंदर्यकरण करणे या अंतर्गत धबधबा करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते.
यामुळे कणकवलीत येणाऱ्या पर्यटकांना जिल्ह्यात अन्य धबधब्या ऐवजी बारमाही हा धबधबा उपलब्ध व्हावा व यातून कणकवलीच्या पर्यटन विकासाला चालना मिळावी हा उद्देश डोळ्यासमोर धरून हा हे काम प्रस्तावित करण्यात आले होते.

गेली दोन वर्षाहून अधिक काळ हे काम प्रलंबित राहिले होते. दरम्यान आमदार नितेश राणे यांचे नुकतेच या प्रश्नी नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी लक्ष वेधले होते. त्यानुसार आमदार नितेश राणे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे याबाबत लक्ष वेधत पाठपुरावा करून या कामाकरिता तातडीने निधी मंजूर करून देत प्रशासकीय मान्यता देखील मिळवून दिली. जिल्हा नियोजन समितीच्या सचिव तथा जिल्हाधिकारी यांनी याबाबतचे प्रशासकीय मान्यतेचे आदेश दिले असून, कणकवली शहराच्या पर्यटन विकासाची खळाळती व बारमाही गंगा साकार व्हायचे हे काम आता मंजूर झाले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स