आपल्या कार्यकालातील विकासाबद्दल आपण समाधानी ; कांदळगांवच्या माजी सरपंच सौ. उमदी उदय परब यांची प्रसिद्धीपत्राद्वारे कार्याची माहिती.
मसुरे | प्रतिनिधी : आपल्या कार्यकालात मागील पाच वर्षात कांदळगांव मधील विकास कामांचा आलेख मालवण तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्य़ात उल्लेखनीय झाल्याने आपण समाधानी असल्याचे कांदळगावच्या मावळत्या सरपंच सौ. उमदी उदय परब यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.
त्या पुढे म्हणतात, मागील पाच वर्षात कांदळगावात विकास कामांचा अक्षरशः पाऊस पडला. यात मालवण मसुरे रस्ता 2 कोटी, राणेवाडी पायवाटेवरील काम 10 लाख, ग्रामपंचायत हॉल 12 लाख, कांदळगाव स्मशानभूमी मार्ग 49 लाख,त्याच मार्गावर साकव 10 लाख, कांदळगाव शाळा नं 1चे 6 लाख, शाळा नं 2 चे 6 लाख, परबवाडा उत्कर्ष मंडळ वरची वाडी मार्ग रस्ता 5लाख, राणेवाडी रस्ता 10 लाख, शेमाडवाडी रस्ता 6 लाख, चुनेकरवाडी ते काशीनाथ परब पायवाट 2.25 लाख, परबवाडी गणपती पायवाट 2 लाख, तळाणी बंधारा 9 लाख, काजरटवाडी बंधारा 9लाख, परबवाडा उत्कर्ष मंडळ वरची वाडी मार्ग रस्त्यास संरक्षण भिंत बांधणे 5लाख, कांदळगाव आरोग्य उपकेंद्र दुरूस्ती करणे 3लाख, कांदळगाव महान रस्ता 3 लाख, भक्तनिवास रस्ता 2 लाख, कांदळगाव स्मशानभूमी व कंपाऊंड वॉल बांधणे 5लाख, तिर्थक्षेत्र पर्यटन क दर्जा प्राप्त करून दरवर्षी गावाला विकास कामांसाठी 25 लाख निधी मंजूर करण्यात आला आहे.शिवाय 14व्या वित्त आयोगातील निधीतून व 15 व्या वित्त आयोगातून विविध कामे झाली ती वेगळीच. महिलांसाठी 8 मार्च रोजी विविध कार्यक्रम, आठवडा बाजार, मुलांसाठी सांस्कृतिक साहित्य, ओझर विद्यामंदिर साठी स्मार्ट टिव्ही, 10वी 12वी विद्यार्थी सत्कार तसेच कांदळगाव वर्दम रस्ता 5लाख, कांदळगाव महान परबवाडी रस्ता 10 लाख, कांदळगाव काजरटवाडी स्मशानशेड व कंपाऊंड वॉल 5लाख, ग्रामपंचायत हॉल रंगरंगोटी 5लाख, कांदळगाव परबवाडी अंगणवाडी 9 लाख, इत्यादी कामे मंजूर असून वर्क ऑर्डर झालेली आहेत. राणेवाडी साकव http://localhost/news/public/uploads/20 लाख, कांदळगाव महान रस्ता 10 लाख, राणेवाडी रस्ता 10 लाख, शांताराम चव्हाण घर रस्ता 3 लाख, कांदळगाव देऊळवाडी लक्ष्मी पंडीत पायवाट 3 लाख, सोनजी वारंग घरानजिक साकव 10 लाख, कांदळगाव ग्रामपंचायत नजीक विहीर 12 लाख, कांदळगाव परबवाडी विहीर 9 लाख, कांदळगाव कदमवाडी नळयोजना दुरूस्ती 6 लाख, ग्रामपंचायत तेआयकर घर नळपाणी योजना 10 लाख, खांबडवाडी नळपाणी योजना 10 लाख, पराडकर कॉलनी रस्ता 13 लाख, नळपाणी योजना 6 लाख, ओझर येथे भव्य प्रवेशद्वार व छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, साळकरवाडी येथे कांदळवन बोटिंग, देऊळवाडी येथे नाट्यगृह, कांदळगाव ग्रामपंचायत वर सुसज्ज हॉल, वाचनालय येथे डांबरीकरण 3लाख, ग्रामपंचायत परिसर सुशोभीकरण 8 लाख, कांदळगाव bsnl टॉवर अशी विविध कामे पुर्ण होण्यासाठी पाठपुरावे करण्यात आले असुन पुढील वर्षभरात सदर कामे मार्गी लागतील. या कामी वरिष्ठ पातळीवरील जेष्ठ सर्व लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य लाभले असून माजी सभापती उदय परब यांचे विशेष योगदान लाभले. तसेच कोरोना काळात आपल्या सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी ग्रामसेवक श्री पेठे, श्री देसाई यांच्या बरोबर पंचायत समिती अधिकारी, जिप अधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ व मुंबई स्थित ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले. त्यामुळेच श्री देव रामेश्वराच्या आशीर्वादाने आणि तमाम कांदळगाव वासियांच्या आपुलकी मुळे 15 वर्षे ग्रामपंचायत मध्ये कार्यरत होते आणि आपल्या कारकीर्दीत आपण समाधानी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)