ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या मृत्यूमुखी..!

बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या मृत्यूमुखी..!

प्रकाशन: 27 Dec 2022 11:49 AM
वाचन संख्या 102

भरणी येथील राघो घाडी यांच्या दोन शेळ्या बिबट्याने केल्या फस्त.

शिरगाव | संतोष साळसकर :
कणकवली तालुक्यातील भरणी-घाडीवाडी येथील वस्तीत राघो लवू घाडी यांच्या गोठ्यातील दोन बकऱ्यांवर बिबट्याने हल्ला करून ठार मारण्याची घटना रविवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली. भरवस्तीत बिबट्याने हल्ला केल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. भरणी- घाडीवाडी येथे बिबट्याचा राजरोसपणे संचार सुरू आहे. शेतकरी राघो घाडी यांच्या गोठ्यातील दोन बकऱ्यांना ठार मारण्याची घटना घडली. यात त्यांचे सुमारे १६ ते १८ हजाराचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनखात्याचे गुडेकर, श्रीमती राठोड, पोलीस पाटील लक्ष्मीकांत ताम्हणकर, अशोक घाडी, तुषार घाडी, नंदू घाडी, किरण मेस्त्री, अनिल बागवे, प्रशांत घाडी आदी उपस्थित होते. यावेळी नुकसानीचा करण्यात आला. भरणी घाडीवाडी या परिसरात बिबट्याच्या संचारामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. पंचनामा वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स