आनंद मालाडकर राष्ट्रचेतना पुरस्काराने सन्मानित..!
मसुरे | प्रतिनिधी :
लेक माझी लाडकी अभियान महाराष्ट्र राज्य,भारत गौरव राष्ट्रचेतना पुरस्कार २०२२ या विशेष पुरस्काराने मुणगे गावचे सुपुत्र व यशस्विनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.आनंद गणपत मालाडकर याना सन्मानित करण्यात आले.
साने गुरुजी जयंती निमित्त मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात सदर पुरस्कार वितरित करण्यात आला.
यशस्विनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.आनंद गणपत मालाडकर यांना महिला व बालकल्याण,सामाजिक कार्याची दखल घेत उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल मुंबईचा माजी महापौर सौ.स्नेहल आंबेकर,महाराष्ट्र महिला आयोग सदस्या ॲड.आशाताई लांडगे,नायर रुग्णालयाचा अधिष्ठता डॉ.सारिका पाटील, मिसेस स्टाईल आयकॉन विजेती स्नेहल भोपळे, उद्योजिका सौ.संगीताताई गुरव यांचा उपस्थितीत आडबंदरचे सुपुत्र श्री.आनंद मालाडकर यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
मुणगे प्रभाग क्रमांक ०१, प्रभागसेविका सौ.रविना मालाडकर, सौ.अंजली सावंत, प्रभागसेवक श्री.धर्माजी आडकर, माजी सरपंच सौ.सायली बागवे तसेच सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)