ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
दातृत्वाची भावना मनात ठेवा ; श्री श्री १०८ महंत मठाधिश प. पू.गावडेकाका महाराज यांचे आवाहन.

दातृत्वाची भावना मनात ठेवा ; श्री श्री १०८ महंत मठाधिश प. पू.गावडेकाका महाराज यांचे आवाहन.

प्रकाशन: 27 Dec 2022 12:19 PM
वाचन संख्या 106

श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट वर्धापन दिन उत्साहात.

मसुरे | प्रतिनिधी :
आपल्या पूर्वजानी रितीरिवाज जपून पुण्य कमावल्यामुळे त्याचे फायदे आपण घेत आहोत. तुम्ही सुद्धा पुण्य कमवा. दातृत्व, प्रेम भावना ठेवा.जीवनशैली सुसंस्कृत आणि आनंदित होण्यासाठी दातृत्वाची भावना ठेवा. स्वामी समर्थ मठाच्या माध्यमातून अनेकांना वैधकीय मदत, अनेक संसार सावरण्यासाठी मदत केली जाते. एक एक रुपया लोक कल्याणासाठी वापरला जात आहे. कोरोना काळात आपल्या मदतीचा अनेकांना दिलासा लाभला होता. तुमच्यातील दातृत्व असेच कायम ठेवा. असे आवाहन श्री श्री १०८ महंत मठाधिश प. पू. गावडेकाका महाराज यांनी येथे केले.

Article image

श्री सद्गुरु भक्त सेवा न्यास रजि. संलग्न श्री स्वामी समर्थ मठ मसदे, वडाचापाट – मालवण येथे  श्री स्वामी समर्थ मठाचा ११ वा वर्धापन दिन सोहळा विविध उपक्रमांनी संपन्न झाला.

सकाळी श्री स्वामी समर्थांची षोडशोपचार पूजाअर्चा, पालखी पूजन, अक्कलकोट पादुका आणि पालखी मिरवणूक,त्यानंतर श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सद्गुरु श्री गावडेकाका महाराज यांचे आगमन आणि अध्यात्मिक मार्गदर्शन झाले.
दुपारी भाविक भक्तांच्या वतीने सामुहिक स्वामींना नैवेद्य अर्पण, महाआरती, महाप्रसाद अन्नदान,
सायंकाळी सुस्वर भजने,रात्रौ अमृत नाथ दशावतार नाटय मंडळ, गांव- म्हापण यांचा ‘कुर्मदासाची वारी’ हा दशावतार नाट्यप्रयोग झाला.
यावेळी श्री सद्गुरू भक्त सेवा न्यासचे विश्वस्त सिद्धेश किऺनळेकर,सौ.कुशे मॅडम, श्री आबेसकर, निशिकांत पिऺगुळकर, देविदास रेडकर,ह भ‌प श्यामसुंदर परब, दादा गावडे, माजी सभापती राजेंद्र प्रभूदेसाई, रविंद्र प्रभूदेसाई,केंद्र प्रमुख साई पेडणेकर,सौ सीता गावडे, जिजी पाटकर, तानाजी पाटील, दिलिप देसाई, कोळंब सरपंच सौ सिया धुरी, सुधीर पडेकर, गौतम खोत, गोपाळ पालव आदी स्वामी सेवक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स