भरणी येथील सखाराम वायंगणकर यांच्या काजू बागेत आग लागल्याने नुकसान..!
२५० काजू कलमे जळून भस्मसात ; सुमारे ८५ हजाराचे झाले नुकसान.
संतोष साळसकर | शिरगांव :
कणकवली तालुक्यातील भरणी- घाडीवाडी येथील सखाराम नारायण वायंगणकर यांच्या काजू कलम बागेस आग लागून त्यांचे सुमारे ८५००० रुपयांचे नुकसान झाले आहे.
भरणी येथील सखाराम वायंगणकर यांची ‘वडाचे भरड’ या ठिकाणी काजू कलम बाग आहे. या बागेस अज्ञात इसमानी आग लावल्यामुळे ऐन पिकाच्या हंगामात त्यांच्या सुमारे २५० काजू कलमे आगीत होरपळून सुमारे ८५ हजाराचे नुकसान झाले आहे. तरी याबाबत संबंधित खात्याने पाहणी करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सखाराम वायंगणकर यांनी केली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)