ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
मालवण शहरातील रस्त्यांच्या कामाबाबत माजी बांधकाम सभापती मंदार केणी व तपस्वी मयेकर यांचा इशारा…!

मालवण शहरातील रस्त्यांच्या कामाबाबत माजी बांधकाम सभापती मंदार केणी व तपस्वी मयेकर यांचा इशारा…!

प्रकाशन: 26 Dec 2022 07:54 PM
वाचन संख्या 62

मुख्याधिकाऱ्यांकडे केले निवेदन सादर.

मालवण | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा नियोजन मधून सुमारे ५० लाख रुपयांचा निधी मालवण शहरातील रस्त्यांच्या कारपेटच्या कामासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र वर्षभराचा कालावधी उलटून गेला तरी संबंधित ठेकेदाराने ही कामे केलेली नाहीत. त्यामुळे तत्काळ या कामास सुरुवात न झाल्यास येत्या २६ जानेवारीला पालिकेच्या बाहेर उपोषणास बसणार असल्याचा इशारा पालिकेचे माजी बांधकाम सभापती मंदार केणी, तपस्वी मयेकर यांनी पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना दिला आहे. या बाबतचे निवेदन आज त्यांना सादर करण्यात आले.

जिल्हा नियोजन मधून उपलब्ध झालेल्या ५० लाख रुपये निधीच्या माध्यमातून शहरातील खराब झालेल्या रस्त्यांच्या कारपेटच्या कामाच्या निविदा काढण्यात आल्या. यात धुरीवाडा येथील खोतमठ रस्ता, रांगोळी महाराज रस्ता, वायरी गर्दे रोड रस्ता, वायरी हनुमान मंदिर रस्ता या कामांचा समावेश आहे. या कामांना कार्यारंभ आदेश देऊन वर्षभराचा कालावधी उलटला आहे. मात्र संबंधित ठेकेदाराने अद्याप पर्यंत या कामाला सुरुवात केलेली नाही. या कामांना लवकरात लवकर सुरुवात व्हावी यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. मात्र संबंधित ठेकेदार वारंवार मुदतवाढ मागत आहे. तरी येत्या काही दिवसात संबंधित ठेकेदाराने या कामाला सुरुवात न केल्यास २६ जानेवारीला पालिकेच्या बाहेर उपोषणास बसण्याचा इशारा पालिकेचे माजी बांधकाम सभापती श्री. केणी, श्री. मयेकर यांनी दिला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स