ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समालोचक जय भोसले,अशोक नाईक यांचा गोव्यात सन्मान.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समालोचक जय भोसले,अशोक नाईक यांचा गोव्यात सन्मान.

प्रकाशन: 26 Dec 2022 02:40 PM
वाचन संख्या 63

शिरगांव | संतोष साळसकर :
गोवा राज्यातील नामांकित म्हणून ओळखली जाणारी आणि दर्जेदार आयोजनासाठी प्रसिद्ध असलेली पेडणे तालुक्यातील ध्रुव स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लबच्या क्रिकेट स्पर्धेत सलग ७ वर्षे समालोचन करणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील जय भोसले आणि शिरोडा येथील अशोक नाईक यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

या स्पोर्ट्स क्लबच्या वतीने दरवर्षी पेडणे प्रीमियर लीग तर दर दोन वर्षांनी ध्रुव ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे तसेच महिलांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन सतत केले जात आहे.पेडणे प्रीमियर लीगचे हे सातवे वर्ष होते.यंदा १६ संघांची सहभाग असलेली ही क्रिकेट स्पर्धा तब्बल ६ दिवस चालली.या स्पर्धेत जय भोसले आणि अशोक नाईक यांनी केलेल्या समालोचनाने क्रीडा रसिक मंत्रमुग्ध झाले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी समालोचकांचे कौतुक केले.पुढच्या वर्षी होणारी ध्रुव ट्रॉफीत आठ राज्यातील संघांना आमंत्रण देण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स