ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
महाराष्ट्र राज्यातील संकटांची मालिका थांबू दे…!

महाराष्ट्र राज्यातील संकटांची मालिका थांबू दे…!

प्रकाशन: 27 Sep 2021 02:02 PM
वाचन संख्या 113

रिक्षा संघटनेच्या गणराया चरणी मंत्री उदय सामंत यांचे साकडे;गणेश दर्शन घेऊन केली पूजा व आरती…!

कणकवली | उमेश परब :महाराष्ट्र राज्यावर संकटांची मालिका सुरू असून ही संकटांची मालिका थांबू दे, असे साकडे कणकवलीच्या राजासमोर राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री उदय सामंत यांनी घातले.
सिंधुदुर्ग दौर्‍यावर आलेल्या पालकमंत्र्यांनी रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे प्रतिष्ठापना केलेल्या गणपतीचे दर्शन घेत आरती केली. यावेळी शिवसेनेच आमदार वैभव नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, नगरसेवक कन्हैया पारकर, सुशांत नाईक, अ‍ॅड. हर्षद गावडे, प्रसाद अंधारी, निसार शेख, कलमठ उपसरपंच वैद्यही गुडेकर, विलास गुडेकर, रिमेश चव्हाण, कणकवली रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष बाळा वराडकर, भाई परब, अरुण परब, प्रभाकर कोरगावकर, संतोष सावंत, मनोज वारे, रामकांत आरोलकर, संदीप घाडी, श्री. मोर्ये आदीसह रिक्षा चालक-मालक संघटनेचे सदस्य व शिवसैनिक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स