ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचे श्रेय घ्या,पण पायाभूत सुविधांबाबत संदिग्धता : राजन तेली

चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचे श्रेय घ्या,पण पायाभूत सुविधांबाबत संदिग्धता : राजन तेली

प्रकाशन: 27 Sep 2021 02:08 PM
वाचन संख्या 98

विमानतळ श्रेय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचेच

कणकवली | उमेश परब : चिपी विमानतळाचे ९ रोजी उद्घाटन होत आहे,जनतेची ईच्या पूर्ण होत आहे.शिवसेनेचे आमदार, खासदार, पालकमंत्री आहेत.मात्र, जनतेच्या मनातील काही प्रश्न अनुत्तरित आहेत, त्याचे उत्तर द्यावे.विमानतळ जोड रस्ते,पाणी,३३ केव्ही वीज लाईन कुठे आहे?पायाभूत सुविधांचे काय?उद्या पर्यटक आल्यानंतर सेवा मिळाली नाहीत,तर पर्यटक दुसरा पर्याय शोधणार आहेत.मोपा विमानतळ सुरु झाल्यास पुढे काय? विमानतळ श्रेय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचेच आहे.शिवसेनेने विमानतळाच्या उद्घाटनाचे श्रेय घ्यावे,पण पायाभूत सुविधांचे काय? याचं उत्तर पालकमंत्री व आमदार ,खासदारांनी द्यावे,असा आव्हान भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिले आहे.कणकवली येथील भाजपा जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

चिपी विमानतळावर पाणी प्रश्न आहे.आजही पाणी का देऊ शकले नाहीत.खा.राऊत,माजी पालकमंत्री केसरकर, आताचे पालकमंत्री सामंत यांनी सांगावं,पाणी पुरवठा नळयोजना टेंडर तुमच्याच माणसाने घेतलं आहे.१५ किलोमीटर लाईन टाकली आणि ८ किलोमीटर आजही बाकी आहे.३३ केव्ही लाईन हवी ती ११ केव्ही कशीबशी झाली आहे,त्याला भाजपने विरोध केला का?कुडाळ पिंगुळी मार्गे विमानतळ येथे जाणारा रस्त्याची अवस्था काय आहे?तुमचे हात कोणी बांधले?त्या रस्त्याला आज लही मान्यता नाही.खड्डे भरायला पैसे नाहीत.विमानतळ उद्घाटन करायला निघालेत,असा टोला शिवसेना नेत्यांना राजन तेली यांनी लगावला आहे.

पालकमंत्री केसरकर मागच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते,आता पालकमंत्री उदय सामंत आहेत.पायाभूत सुविधांसाठी मानसिकता लागते.म्हापण पासून रुंदीकरण करायचे आहे,त्यासाठी हायवे प्रमाणे पैसे द्यावेत.केसरकर यांची तिसरी टर्म आहे,खासदार यांची दुसरी टर्म आहे.रस्ता, पाणी, करण्यासाठी तुम्हाला कोणी रोखलं होत का?उद्या मोपा झाल्यावर काय होईल.विमानतळ चालवण्यासाठी पायाभूत सुविधांचे काय?१४ वर्षे झालीत लाईट,पाणी,रस्ते व्यवस्था होण्यासाठी वेळ का लागला?रुंदीकरण होताना पुन्हा अडचण आहेच.श्रेय जरुर घ्या,पण पायाभूत सुविधा उपलब्ध करुन द्या.माझा विरोधासाठी विरोध नाही.पर्यटनासाठी विमानतळ महत्वाचे आहे.आज पर्यटन दिनाच्या निमित्ताने इतर जिल्ह्यातील लोकांना द्यावी,अशी मागणी राजन तेली यांनी केली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स