ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बैलगाडी शर्यती व बैलांची झुंज कार्यक्रमाला परवानगी मिळावी:आ.नितेश राणे

बैलगाडी शर्यती व बैलांची झुंज कार्यक्रमाला परवानगी मिळावी:आ.नितेश राणे

प्रकाशन: 27 Sep 2021 01:55 PM
वाचन संख्या 179

पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडे मागणी

उमेश परब /कणकवली : कोविड १९ या महामारीच्या कालावधीमध्ये शासनाने सर्व प्रकारच्या सार्वजनिक व करमणूकीच्या कार्यक्रमांवर बंधने आणलेली होती . त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात गेले दीड वर्षे सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम बंद आहेत . आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे टप्प्याटप्प्याने सार्वजनिक कार्यक्रमांवरील बंधने दूर करण्यात येत आहेत . वर उल्लेख केलेल्या बैलगाड्या शैर्यती व बैलांची झुंज ग्रामीण भागातील लोकप्रिय व पारंपारिक कार्यक्रम पूर्वीपासून साजरे करण्यात येत आहेत.त्यांना तातडीने परवानगी द्यावी,अशी मागणी पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडे आ.नितेश राणे यांनी मागणी केली आहे.

तसेच या कार्यक्रमांना बैलांना कोणत्याही प्रकारची इजा व दुखापत होणार नाही याची योग्य ती काळजी घेतली जाईल, असा विश्वास मी तुम्हाला देतो . तरी या कार्यक्रमांना नियम व अटींच्या शैर्यतीस अधीन राहून सुरू करण्यास परवानगी द्यावी ,असे आ.नितेश राणे यांनी पत्रात म्हटले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स