कुडाळ येथे संयुक्त योगोपचार शिबिरास प्रारंभ...!
बांदा | राकेश परब :
पतंजली योग समिती सिंधुदुर्ग मार्फत दैवज्ञ भवन कुडाळ येथे आज पासून संयुक्त योगोपचार शिबिर सुरू करण्यात आले आहे सदर शिबिर २२ डिसेंबर ते २६ डिसेंबर २०२२ पर्यंत चालू राहील. या शिबिराला उद्घाटक म्हणून लायन्स क्लब कुडाळ चे प्रेसिडन्ट ऍडव्होकेट समीर कुलकर्णी आणि अध्यक्ष म्हणून काका कुडाळकर लाभले. त्यावेळी पतंजली योगसमिती गोवा राज्य प्रभारी विश्वास कोरगावकर , युवा भारत गोवा राज्य प्रभारी गिरीश परूळेकर , पतंजली योग समिती सिंधुदुर्ग सहजिल्हा प्रभारी शेखर बांदेकर, स्वानंद पवार, सौ मेघा सुकी, सौ अस्मिता बांदेकर, सौ तृप्ती तोरसकर आदी उपस्थित होते. दिप प्रज्वलनाने उद्घाटन झाल्यानंतर योगवर्ग घेण्यात आला. दैवज्ञ भवन च्या व्यवस्थापकांनी सदर शिबिरासाठी लागणारे स्टेज, साउंड सिस्टीम आणि जागा मोफत उपलब्ध करून दिली. कुडाळ शहरात पतंजली योगसमिती चा योगवर्ग चालू रहाण्यास जी काही मदत लागेल ती आपण लायन्स क्लब च्या माध्यमातून करेन असे उदघाटक समीर कुलकर्णी यांनी सांगितले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)