ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
उद्योजिका सुषमा सावंत यांचा मसुरे येथे सत्कार..!

उद्योजिका सुषमा सावंत यांचा मसुरे येथे सत्कार..!

प्रकाशन: 22 Dec 2022 02:33 PM
वाचन संख्या 263

मसुरे | प्रतिनिधी :
मसुरे केंद्र शाळा आज सर्व शेत्रात प्रगती करत आहे हे पाहून प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी म्हणून आम्हाला गौरवाचे आहे. या प्रशालेने आम्हाला घडविल्यामुळे आज आम्ही सर्व मुले चांगली घडलो. यापुढे या प्रशालेच्या उन्नतीसाठी आम्ही सदैव तयार आहोत असे प्रतिपादन मसुरे केंद्र शाळेच्या माजी विद्यार्थीनी तथा मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजिका सुषमा सावंत यांनी मसुरे येथे सत्कारास उत्तर देताना केले.
मसुरे केंद्र शाळेच्या माजी विद्यार्थीनी उद्योजिका सौ. सुषमा सावंत यांनी मसुरे केंद्र शाळेला सदिच्छा भेट दिली. या वेळी मसुरे केंद्र शाळेच्या वतीने सुषमा सावंत यांचा या प्रशालेच्या मुख्याध्यापिका शर्वरी सावंत यांच्या हस्ते हृदय सत्कार करण्यात आला. यावेळी सुषमा सावंत यांनी
शाळेत राबविल्या जाणा-या सर्व उपक्रमांची माहिती घेतली. तसेच शाळेच्या प्रगतीविषयी कौतुक केले. तसेच शालेय उपक्रमांसाठी शैक्षणिक उठाव म्हणून रोख ५१०१/- आर्थिक देणगी दिली.

यावेळी मुख्याध्यापिका सौ. शर्वरी सावंत, सौ. लक्ष्मी पेडणेकर, गुरुनाथ ताम्हणकर श्रीमती मगर मॅडम, श्री गावडे सर, भूषण सावंत आणि
शिक्षकवर्ग, ग्रामस्थ, पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन गुरुनाथ ताम्हणकर यांनी केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स